दिनांक :- 25 नोव्हेंबर 2016 लेख क्र.58 भारतीय संविधान -आमचा अभिमान जगाच्या पाठीवर सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगालाही मोठी देणगी दिली आहे. आपले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत झाले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. या घटनेला जवळपास 67 वर्षे पुर्ण होत आहेत. आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे उद्गाते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, विचारवंत, तत्वज्ञ, दलितांचे कैवारी, एक चाकोरीबाह्य असे उत्तुंग व्यक्तीमत्व अशी कितीतरी विशेषणे ज्यांना लावली त...
अलिबाग,दि.28(जिमाका) :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.12 जानेवारी 2022 रोजी मार्गदर्शक सूचनानुसार नागरिकांनी कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करावी. तसेच ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य यंत्रणेला कळवावे व त्वरीत योग्य ते उपचार घ्यावेत. आरोग्य यंत्रणेने ही कीट नागरिक जास्तीत जास्त वापरतील व चाचणी पॉझिटीव्ह आल्यास तात्काळ शासकीय यंत्रणेला कळवतील, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सर्व मेडीकल स्टोअरवरील विक्रेत्याने या कोरोना चाचणी कीट वापराबाबत नागरिकांना मागर्दशन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 00000
अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्याबाबत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई यांच्याकडून कळविण्यात आल्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पूर्ण न झालेल्या) निवृत्त न्यायाधीश, वकील (सनद प्राप्त), चार्टर्ड अकाऊंटंट यांच्याकडून इच्छुकांचे अर्ज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग कार्यालयाकडून मागविण्यात आले आहेत. अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड व अधिनस्त सर्व तालुका उपनिबंधक सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात दि.18 जून 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. संबंधितांनी अर्जासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा,शैक्षणिक संबंधित कागदपत्...
Comments
Post a Comment