रायगड किल्ला संवर्धन आराखडा मुख्यमंत्र्यांना सविस्तर सादरीकरण
दिनांक :-
04/10/2016 वृ.क्र.644
रायगड किल्ला संवर्धन
आराखडा
मुख्यमंत्र्यांना सविस्तर सादरीकरण
अलिबाग दि.04:- (जिमाका) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्यावर घोषित केलेल्या रायगड किल्ला
जतन संवर्धन 520 कोटी रुपयांच्या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण काल विभागीय आयुक्त प्रभाकर
देशमुख व रायगड जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांसमोर
मंत्रालय मुंबई येथे केले. यावेळी पर्यटन राज्यमंत्री
मदन येरावार, वित्त व नियेाजन राज्यमंत्री दिपक केसरकर तसेच पर्यटन सचिव श्रीमती वल्सा
नायर सिंह व इतर अधिकारी उपस्थित होते.
रायगड गडकिल्ला संवर्धन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्राथम्यांचा व
जिव्हाळयाचा विषय आहे. येथील कामकाज सुरु करण्यासाठी
हिवाळी अधिवेशनापूर्वी शंभर कोटी रुपयांचा निधी भारतीय पुरातत्व खात्याकडून मिळविण्याबाबत
आयुक्तांना विनंती केली असता त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फतचा निधी तातडीने
देण्याबाबत संबंधिताना निर्देश दिले.
520 कोटींचा आराखडा
रायगड किल्ला संवर्धन आराखडयामध्ये प्रामुख्याने रायगड किल्ल्यावरील प्राचीन वास्तूचे
संवर्धन, तत्कालीन पध्दतीच्या मार्गिकेचे बांधकाम, पर्यटकांच्या सोयी तसेच सुरक्षेच्या
बाबी, राजमाता जिजाऊंचा वाडा तसेच राजमाता जिजाऊंची समाधी आदि ठिकाणच्या दुरुस्ती व
निगडीत कामे, रायगड परिक्रमा मार्ग, रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रज्जू मार्गआदि कामे
करावयाची आहेत. एकूण प्रस्तावित कामांचा गोषवारा
1) भारतीय पुरातत्व विभागामार्फत त्यांच्या पर्यवेक्षणाखाली करावयाची कामे. 2) रायगड किल्ला, पाचाड येथील समाधी,वाडा परिसरात
पुरातत्व विभागाच्या पूर्व अनुमतीने घ्यावयाची कामे. 3) रायगड किल्ला परिसरात घ्यावायची पर्यटनाची कामे.
. 4) रायगड किल्ला परिसरातील मुलभूत सुविधांची
व विकासाची कामे (7 कि.मी. परिघातील 21 गावे व त्याअंतर्गत वाडया). 5) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय भूतलपरिहवन
मंत्रालयामार्फत आणि सार्वजनिक विभागामार्फत करावयाची कार्यवाही. 6)भूसंपादन, 7) रज्जू मार्ग, 8) आकस्मित खर्च असा
आहे
यावेळी भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी नेगी, कोकण विभागीय उपायुक्त (सा.प्र).श्री.कादबाने,
महाडच्या प्रांत श्रीमती सुषमा सातपुते व इतर अधिकारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment