सुधागड-पाली येथे पत्रकारांशी जिल्हा माहिती कार्यालयाचा माध्यम संवाद
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :- 05/10/2016 वृ.क्र.652
सुधागड-पाली येथे
पत्रकारांशी
जिल्हा माहिती
कार्यालयाचा माध्यम संवाद
अलिबाग दि.05 :- (जिमाका)
माध्यम संवाद या उप्रक्रमांतर्गत जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी आज सुधागड-पाली तालुक्यातील प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद
साधला.
जिल्हयातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबागमार्फत माध्यम संवाद हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सुधागड-पाली येथील जिल्हा परिषद विश्रामगृह येथे हा माध्यम संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुधागड-पाली तालुका पत्रकार संघटनेचे
अध्यक्ष विनोद भोईर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी यावेळी
बोलताना म्हणाले की, जिल्हा माहिती कार्यालयामार्फत
शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे प्रसार माध्यमांद्वारे पोहचविण्यासाठी फेसबुक,
ट्विटर हॅन्डल, यु टयूब, व्हॉटस्अप, ब्लॉग अशा विविध माध्यमांचा उपयोग करण्यात
येतो. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत
सुरु असलेल्या महान्यूज या लोकप्रिय वेब पोर्टलवर शासनाच्या राज्यभरातील
महत्वाच्या बातम्या, लेख प्रसारित करण्यात येतात. त्याद्वारेही प्रसार माध्यमांना
सहजतेने व तत्परतेन माहिती मिळू शकते त्याचा जास्तीत जास्त उपयोग प्रसार माध्यम
प्रतिनिधींनी करावा. महान्यूज वेबपोर्टलवर प्रसिध्द झालेली बातमी, लेख हे जगभरात
पोहचतात. त्यामुळे जिल्हयातील प्रसार माध्यम प्रतिनिधींनी
महत्वूपर्ण विशेष लेख, यशकथा महान्यूजसाठी पाठवाव्यात. महासंचालनालयामार्फत प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य
मासिका विषयी माहिती देऊन या मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहन केले. तसेच शासनामार्फत पत्रकारांना अधिस्वीकृती
पत्रिका देण्यात येते. याबाबतच्या
नियमांची माहिती त्यांनी पत्रकारांनी यावेळी दिली व अधिस्वीकृती पत्रिका मिळविण्यासाठी
अर्ज करावे असेही सांगितले. तसेच पत्रकारांसाठी शासनामार्फत विविध पुरस्कार
देण्यात येतात. यासाठीही माध्यम प्रतिनिधींनी आपले अर्ज करावेत असे सांगितले.
माध्यम
संवाद हा उपक्रम अतिशय चांगला असून यामुळे माध्यम प्रतिनिधींनी थेट संवाद होण्यास
मदत होते. तसेच येणाऱ्या अडचणी सोडविण्यास याचा उपयोग होईल. जिल्ह्यातील विविध विभागातील वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी या उपक्रमाद्वारे माध्यम प्रतिनिधींना माहिती द्यावी. यासाठी जिल्हा
माहिती कार्यालयाने समन्वय करावा अशा सूचना उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी यावेळी
केल्या.
उपस्थित
प्रतिनिधींचे तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विनोद भोईर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास
अमित गायकवाड, रविंद्र ओव्हाळ, भगवान शिंदे,निलेश धारिया, परेश शिंदे,संतोष
उतेकर,अनुपम कुलकर्णी,सचिन देशमुख,दिपक पवार,शरद निकुंभ,राजेंद्र मेहता, महेंद्र
निकुंभ हे माध्यम प्रतिनिधी तसेच जिल्हा
माहिती कार्यालयाचे हिरामण भोईर, जयंत ठाकूर आदि उपस्थित होते.
0000000
Comments
Post a Comment