राष्ट्रीय कृषी विकास योजना संरक्षित शेती व्यक्तिगत लाभासाठी अर्ज मागविले
अलिबाग,दि.27:- कृषी
विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत संरक्षित शेती
व्यक्तिगत लाभाच्या घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी
5ऑगस्ट पर्यंत www.hornet.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. फलोत्पादन यांत्रिकीकरण या घटकांतर्गत
पुर्वसंमती अर्जाची मूळ प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी, यांच्या कार्यालयात 5ऑगस्ट पर्यंत सादर करावेत. लाभार्थ्यांनी कोणत्या घटकासाठी
लाभ घ्यावयाचा आहे ते स्पष्टपणे अर्जामध्ये नमूद करावे. विहीत मुदतीमध्ये प्राप्त अर्जांपैकी
लक्षांकास अधीन राहून लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने जिल्हास्तरावर
करण्यात येईल. फलोत्पादन यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या सात
बारा उताऱ्यावर फळपिके,भाजीपाला पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. या योजनांमध्ये संरक्षित
शेती तसेच फलोत्पादन यांत्रिकीकरण यासारख्या घटकांचा लाभ दिला जाणार असून लाभार्थ्यांने अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी
कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रायगड अलिबाग यांनी
केले आहे.
00000000
Comments
Post a Comment