विभागीय माहिती कार्यालयामार्फत लोकराज्य वर्गणीदारांसाठी विशेष मोहीम



नवी मुंबई, दि.29 :-विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई यांच्यामार्फत 1 ऑगस्ट 2017 पासून लोकराज्य वार्षिक वर्गणीदार मोहीम सुरु करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसिध्द होणारे लोकराज्य हे मासिक शासनाचे उत्कृष्ट मुखपत्र आहे. लोकराज्य मासिक शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणारे एक उत्कृष्ट साधन आहे. लोकराज्य   मासिक मराठी, हिंदी, इंग्रजी,  गुजराथी, उर्दू या भाषांमधून दरमहा प्रकाशित होते. शासनाच्या या मासिकाचे वर्गणीदार जास्तीत जास्त लोकांनी व्हावे यासाठी हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेची सुरुवात दि. 1 ऑगस्ट 2017 पासून रोहा जि.रायगड येथून होणार आहे. लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी नजिकच्या जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

000 000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत