जिल्ह्यातील प्रश्नांबाबत मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन मार्ग काढणार- ना. प्रकाश महेता



अलिबाग,दि.6,(जिमाका)- रायग्ड जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन्माननीय सदस्यांनी चर्चा केली. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनापुर्वी मंत्रालयस्तरावर संबंधित विभागाच्या मंत्रीमहोदयांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांनी आज पत्रकारांना दिली.
            जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते  उपस्थित पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांचे समवेत  जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना ना. महेता म्हणाले की,  यंदा प्रथमच जिल्ह्यात 99.9 टक्के मंजूर नियतव्यय खर्च झाला आहे.  त्यामुळे विकासकामांना गती आली.  रायगड जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठि जिल्ह्यात शौचालय बांधकाम पुर्ण करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येईल.
            जिल्ह्यात मुद्रा बॅंक योजनेअंतर्गत 15 हजार 377 लाभार्थ्यांना 15 कोटी 76 लक्ष रुपयांचे कर्ज उद्योग व्यवसायासाठी देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.   ना. महेता यांच्या हस्ते 'यशवंत' या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील यशोगाथांवर आधारीत पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. जिल्हास्तरीय मुद्रा बॅंक योजना प्रचार प्रसार समन्वय समितीच्यावतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज