माजी सैनिक गुणवंत पाल्यांना गौरव पुरस्कार


अलिबाग,दि.24(जिमाका)-  शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये इयत्ता 10वी व 12वी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधीक गुण मिळवुण उत्तीर्ण झालेले असतील अशा माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी माजी सैनिक विधवेचा अर्ज.,फॉर्म डी.डी.40.,विधवेचे ओळखपत्र.,10वी, 12वीच्या प्रमाणपत्राची/गुणपत्रीकेची साक्षांकीत प्रत.,डिस्चार्ज बुकामध्ये कुटूंबाची नावे असलेल्या पानाची छायांकीत प्रत.,राष्ट्रीयकृत बँक पासबुकची छायांकीत प्रत आदी कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत सादर करावीत. जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिकांच्या  विधवा पत्नींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण आधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत