जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी स्विकारला पदभार
अलिबाग दि.24, (जिमाका):- नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी
(भा.प्र.से.) यांनी आज सकाळी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. आज सकाळी डॉ.
सुर्यवंशी यांनी अप्पर जिल्हाधिकारी पी. डी.
मलिकनेर यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्विकारली. तत्पूर्वी श्री. मलिकनेर
यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. सूर्यवंशी
यांचे स्वागत केले. यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे आदी उपस्थित होते. त्यानंतर राजस्व सभागृहात
जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा
नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्व
विभागांनी आपला प्राथमिक लेखाजोखा सादर केला. सर्व विभागप्रमुखांकडून
जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी डॉ.
सूर्यवंशी यांचा अल्पपरिचयः-
जिल्हाधिकारी डॉ. विजय नामदेवराव सूर्यवंशी हे भौतिक शास्त्र विषयाचे आणि कायद्याचे पदवीधर
आहेत. तसेच व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेतील
एमबीए (विपणन) ही पदव्युत्तर पदवी व पीएच.डी ही पदवीही त्यांनी संपादन केली
आहे. 2006
च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे(आय.ए.एस.)अधिकारी असलेले डॉ.सुर्यवंशी यांनी औद्योगिक
विकास महामंडळात सह मुख्य कार्यकारी अधिकारी, जुलै 2013 ते ऑगस्ट 2014 मध्ये कोल्हापूर
जिल्हा परिषदेचे मुख्य् कार्यकारी अधिकारी आणि ऑगस्ट् 2014 ते 1 एप्रिल 2015 या कालावधीत
नव्यानेच निर्मिती झालेल्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
म्हणून काम केले आहे. कोल्हापूर येथे कार्यरत
असतांना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी ऑपरेशन
कायापालट हा उपक्रम राबवून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांचे बळकटीकरण
केले. त्यांचा हाच उपक्रम पुढे ऑपरेशन कायाकल्प म्हणून केंद्र सरकारने अंगिकृत केला.
याबद्दल त्यांना केंद्र शासनाचा पंचायत राज सशक्तीकरण
पुरस्कार, यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार मिळालाय. शिवाय गोंदीया जिल्हाधिकारी म्हणून 8 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2016 या कालावधीत काम करतांना
त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेचे उत्कृष्ट कामकाज
केल्याबद्दलही केंद्र शासनाचा मनरेगाच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी पुरस्कार मिळाला
आहे. त्यानंतर ते संरक्षण राज्यमंत्र्यांचे
स्वीय सचिव होते. त्यानंतर ते आज रायगड जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.
०००००
Comments
Post a Comment