आंबेपुर येथे स्वच्छ पंधरवाड्याचा शुभारंभ



               अलिबाग जि. रायगड, दि.२-मिशन अंत्योदय ग्राम समृद्धी व स्वच्छ पंधरवड्याचा (दि. १ ते १५ ऑक्टोबर) आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आंबेपुर येथे शुभारंभ करण्यात आला.
             आंबेपुर ग्रामपंचायतीच्या वतीने को.ए. सो.ना.ना.पाटील शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात आयोजित समारंभात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, जि.प.उपाध्यक्ष आस्वाद पाटील,जि. प.सद्स्य श्रीमती चित्रा पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी  अभय यावलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे,आंबेपुर उपसरपंच सुनील राऊत,प्र. सभापती प्रकाश पाटील,जि. प.स.सद्स्य रचना  पाटील,पोयनाडचे पोलीस निरीक्षक श्री. शेवाळे, ना.ना.पाटील संकुलचे मुख्याध्यापक आर.के.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
             प्रथम मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शात्री यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
             यावेळी आ.पंडितशेट पाटील म्हणाले की, गांधीजींनी सांगितले की खेड्याकडे चला, याचा मी आदर करतो. आपले गाव आपणच स्वच्छ ठेवले पाहिजे, असा संकल्प करू या, असेही ते यावेळी म्हणाले.
             जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले की, सर्वांनी आपले गाव प्लास्टिक मुक्त करू या.कापडी पिशवीचा वापर केला तर आपल्या गावाचा संदेश संपूर्ण देशाला जाईल व हि ग्रामपंचायत एक आदर्श ठरेल.सर्वांनी स्वच्छतेचा संदेश घेऊन दररोज आपल्या पासूनच स्वच्छता करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 
             यावेळी रा.जि. प.सदस्य श्रीमती चित्रताई पाटील यांनी स्वच्छते विषयी मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले.
             कार्यक्रमास को.एस. सो.ना.ना.पाटील संकुलाचे शिक्षक,शिक्षिका,तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज