हवामान आधारीत फळपिक विमा योजना
रायगड जिल्ह्यात आंबिया बहार सन 2017-18 मध्ये
फलपिक विमा योजना हवामान आधारित फळपिक विमा योजना या नावाने कार्यान्वित आहे. या
योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी काजू फळपिका करीता
30 नोव्हेंबर व आंबा या फळपिकाकरीता 31 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. या योजनेबाबत
शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी माहिती देत आहोत. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी
व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले आहे.
योजनेची उदिष्ट्ये- कमी-जास्त पाऊस, पावसाचा खंड, वेगाचा वारा., पिकांच्या नुकसानीच्या
अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
योजनेची वैशिष्ट्ये-कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना
ऐच्छिक आहे.शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा विमा संरक्षित रक्कमेच्या पाच टक्के किंवा वास्त्वदर्शी दर यापेकी जी कमी
रक्कम असेल ती रक्कम असा मर्यादित दर ठेवण्यात आला आहे.
योजना कार्यान्वयन यंत्रणा- पंतप्रधान पिक विमा योजना रायगड जिल्ह्यात
एच.डि.एफ.सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.
विमा
कंपनीचे नाव- एच.डि.एफ.सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी- रायगड
योजनेत सहभागी शेतकरी- सर्व कर्जदार,बिगर कर्जदानर शेतकरी व योजनेत भाग घेण्यात पात्र आहेत.
अधिसूचित करावयाची पिके-आंबा, काजू
जोखमीच्या बाबी- या योजनेअंतर्गत पुढील कारणांमुळे होणाऱ्या
पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीत पर्यंत विमा संरक्षण दिले जाईल.
आंबा समाविष्ट जिल्हे (5) ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग व
पालघर
विमा
संरक्षण प्रकार (हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी ) तसेच प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान
भरपाई रक्कम प्रती हेक्ट्र रुपये-
अवेळी पाऊस-दि.1 जानेवारी,2018 ते 15 एप्रिल,2018 -कोणत्याही 1 दिवस 5
मी.मी.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.9000/-देय., कोणत्याही सलग 2
दिवस 5 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.13,300/-देय.,
कोणत्याही सलग 3 दिवस 5 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम
रु.22,000/-देय (कमाल देय रक्क्म रु.22000/-)
कमी तापमान-दि.1 डिसेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी
2018- कोणत्याही 3 दिवस 13 डिग्री. सेल्सिअस. मी.मी.
किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.3900/-देय., कोणत्याही 4 दिवस 13 डिग्री. सेल्सिअस. मी.मी.
किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.7,800/-देय., कोणत्याही 5 दिवस 13 डिग्री.
सेल्सिअस. मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.11,100/-देय.,
कोणत्याही 6 दिवस 13 डिग्री.सेल्सिअस. मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास
रक्कम रु.15,000/-देय., कोणत्याही 7 दिवस 13 डिग्री.सेल्सिअस. मी.मी. किंवा
त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.22,000/-देय., (कमाल देय रक्क्म रु.22000/-)
जास्त तापमान-दि.15मार्च 2018 ते 31 मे-2018- सलग कोणत्याही 2दिवस 37.5 डिग्री. सेल्सिअस.
मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्क्म रु.11,100/-देय., कोणत्याही 3 दिवस 37.5डिग्री.सेल्सिअस. मी.मी. किंवा
त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्क्म रु.22000/-देय., कोणत्याही 4 दिवस 13 डिग्री.सेल्सिअस.
मी.मी.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्क्म रु.11,100/-देय., कोणत्याही 6
दिवस 37.5डिग्री.सेल्सिअस. मी.मी.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम
रु.33,300/-देय., कोणत्याही 5दिवस 37.5 डिग्री.सेल्सिअस. मी.मी.किंवा त्यापेक्षा
जास्त पाऊस झाल्यास रक्क्म रु.44,000/-देय.,(कमाल देय रक्क्म रु.44000/-) एकूण
विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी -1,10,000/- गारपीट-एक जानेवारी 2018 ते 30 एप्रिल
2018 विमा संरक्षीत रक्कम रु. 36,700/-
विमा
धारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची
माहिती विमा कंपनीस, संबंधित मंडळ कृषि
अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास
व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकूण
विमा संरक्षित रक्क्म(नियमित+गारपीट) (रु.प्रती हे.) 1,10,000+36,700 = 1,46,700
काजू समाविष्ट् जिल्हे (7)कोल्हापूर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड,
ठाणे, पालघर व नाशिक
फळपिकाचे नाव-हवामान
धोका व कालावधी- प्रमाणके (ट्रिंगर) व नुकसान भरपाई
रक्कम (प्रती हे.रु.)
अवेळी पाऊस-दि.1 डिसेंबर,2017 ते 28 फेब्रुवारी, 2018 -कोणत्याही 1 दिवस 5 मी.
मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.10,000/-देय., कोणत्याही सलग 2
दिवस 5 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.20,000/-देय.,
कोणत्याही सलग 3 दिवस 5 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम
रु.35,000/-देय., कोणत्याही सलग 4 दिवस 5 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस
झाल्यास रक्कम रु.50,000/-देय
कमी तापमान-दि.1डिसेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018- सलग 3 दिवस 13 डिग्री.सेल्सिअस. मी. मी. किंवा
त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.10,400/- देय., सलग 4 दिवस 13 डिग्री. सेल्सिअस. मी. मी. किंवा
त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.7,800/-देय., कोणत्याही 5 दिवस 13 डिग्री.
सेल्सिअस. मी. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.15,600/-देय.,
सलग 5 दिवस 13 डिग्री. सेल्सिअस. मी. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास
रक्कम रु.15,000/-देय., कोणत्याही 7 दिवस 13 डिग्री. सेल्सिअस. मी. मी. किंवा
त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.26,000/-देय.,
एकूण
विमा संरक्षित रक्कम प्रती हे.76,000/-
गारपीट
1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2018 विमा संरक्षित रक्कम रु.25,300/-
विमा धारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात
नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस, संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्य्क आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा
महसूल, ग्राम विकास व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण
निश्चित करेल.
एकूण
विमा संरक्षित रक्क्म ( नियमित + गारपीट ) ( रु.प्रती हे 76,000+25,300.=1,01,300
विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान-या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्श
दराने आकारला जाणार आहे तथापी शेतकऱ्यांनी फळपीक निहाय प्रती हे. विमा दर
खालीलप्रमाणे आहेत.
बहार-आंबिया, पीके-आंबा, काजू शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त
विमा हप्ता- विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के विमा कंपनीकडून पीक निहाय प्रती
हेक्ट्र प्राप्त वास्तवदर्शी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा
विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल व हे अनुदान
केंद्र व राज्यशासनामार्फत समप्रमाणात दिले जाईल.
योजना अमलबजावणी वेळापत्रक- कर्जदार,बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे
आणि बँकांनी कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांचे घोषणापत्र (डिक्लेरेशन) संबंधित
विमा कंपनीकडे साउदर करणे याबाबतचे आंबिया बहराचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
बँकांना
प्रस्ताव सादर करणेच्या मुदत पुढीलप्रमाणे.
बाब-बँकेकडून अधिसूचित फळपिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले
शेतकऱ्यांचा फळपिकांचा विमा प्रस्ताव (प्रपोजल)बँकाना सादर करणेची मुदत- फळपीक-
काजू आंबा-अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2017 ते 31 डिसेंबर 2017
बँकानी कर्जदार शेतकऱ्यांची घोषणपत्र (डिक्लेरेशन) संबंधित विमा
कंपनीस सादर करण्याची मुदत-काजू- 20 डिसेंबर 2017 आंबा-19 जानेवारी 2018
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव (प्रपोजल) बँकाना सादर
करण्याची मुदत-काजू -30 नोव्हेंबर 2017,आंबा-31 डिसेंबर 2017
फळपीकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि
शेतकऱ्यांनी भरावयाची विमा दर रक्कम
काजू-विमा संरक्षित रक्कम-76,000/- शेतकरी
हिस्सा-3,800/- शेतकऱ्यांनीकरीता विमा दर- % (विमा संरक्षित रक्कमेच्या) 5टक्के.,
आंबा- विमा संरक्षित रक्कम-1,10,000/- शेतकरी हिस्सा-5,500/- शेतकऱ्यांनीकरीता
विमा दर- % (विमा संरक्षित रक्कमेच्या) 5टक्के., कंपनीचे नाव- एच.डी.एफ.सी. अर्गो
जनरल इन्शुरन्स कंपनी.
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-
अलिबाग

Comments
Post a Comment