जिल्ह्यात येत्या 48 तासात उष्णतेच्या लाटेची शक्यता


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  जिल्ह्यात काही भागात येत्या 48 तासात उष्णतेची लाट येऊ शकते,असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागरीकांनी वाढत्या उन्हापासून बचाव करण्याची दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जारी केलेल्या उपाय योजना-
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी  जास्तीत जास्त पाणी प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करावा.  प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असाल तर टोपी किंवा रुमालाने डोके झाकावे, बाहेर पडताना छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकावा. अशक्तपणा, स्थुलपणा असणाऱ्यांनी डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत.  चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज