पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-  राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण हे रविवार दि.4  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
रविवार दि. 4 रोजी सकाळी साडे दहा वा. इंदापूर ता.माणगांव येथे आगमन व तळा मौजे सोनसडे येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या एलआर-11 रस्त्याचे भूमीपूजन. सकाळी सव्वा आकरा वा. जिल्हा नियोजन विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या बोरघर  येथील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन. जिल्हा नियोजन विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या ग्रा.मा.28 बोरघर फाटा ते भानंग (तळा) रस्त्याचे भूमीपूजन. सकाळी साडे आकरा वा. जिल्हा नियोजन विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या मौजे मालाठे,  येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन. दुपारी बारा वा. मौजे चरे खुर्द, गौळीवाडी-भानग कोंड उसर,  येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या एलआर-116 रस्त्याचे भूमीपूजन. दुपारी पाऊणे एक वा.मौजे आनंदवाडी, येथील भाजपा चषक-2018 या क्रिकेट स्पर्धेला सदिच्छा भेट. दुपारी एक वा. तळा तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसमवेत बैठक. स्थळ :- कैलास पायगुडे, तालुकाध्यक्ष भाजपा यांचे निवासस्थान. दुपारी दोन वा. तळा येथून पनवेल  कडे प्रयाण. दुपारी साडे चार वा. पनवेल येथे आगमन व महापौर चषक कुस्ती स्पर्धेला सदिच्छा भेट. स्थळ :- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, सेक्टर-1, कळंबोली. सायं. पाच वा. कळंबोली येथून उल्हासनगर कडे प्रयाण.

 00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज