दिव्यांगांच्या उन्नतीसाठी सर्व समाजघटकांचे प्रयत्न आवश्यक-राज्य अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांचे प्रतिपादन



अलिबाग जि.रायगड (जिमाका) दि.9- दिव्यांगांच्या उन्नतीसाठी समाजातील सर्व घटकांनी संघटित पणे प्रयत्न व जनजागृती करावी असे प्रतिपादन  अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केले. 
रायगड जिल्हा परिषद,अपंग कल्याण आयुक्तालय पुणे व सुहित जीवन ट्रस्ट पेण यांच्या संयुक्त विद्यमाने  दिव्यांगांचे त्वरित निदान, हस्तक्षेप व पुनर्वसन जनजागृती एकदिवशी कार्यशाळा सी सॉम फार्महाऊस पेण येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. 
कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डांबसे, पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पेणकर , उपसभापती शैलेश पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲड.निलिमा पाटील, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, तहसिलदार अजय पाटणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील, जि.प. चे समाज कल्याण अधिकारी गजानन लेंडी, डॉ.अश्विनी वैशंपायन, किशोर वेखंडे, वासंती देव आदि उपस्थित होते. 
            यावेळी नितीन पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेने तीन टक्के निधी अपंगांसाठी राखून ठेवून अपंगासाठी कायदे करावे. रायगड जिल्हयातील संस्थाचे  कार्य उत्तम असल्याचे सांगितले. समाजातील दिव्यांग व विकलांग मुलांसाठी असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देऊन अंगणवाडी सेविका आशा वर्कर शिक्षक यांनी यामध्ये जास्त लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी केले.समाजातील वंचित व दुर्बल घटकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. त्यांना अपंगत्व येणार नाही याची काळजी ही त्यांनी घ्यावी.  योगाचा उपयोग मतिमंदाना कसा होईल याचेही प्रशिक्षण देण्याचे आवाहन केले.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, दिव्यांगचे पुनर्वसन व जनजागृती करण्याची खरी भूमिका पालकांची आहे. अपंगाची काळजी घेऊन त्यांना पुढे आणण्याचे काम सर्व घटकांनी करावे, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन पुरेपुर प्रयत्न करतआहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. शासन आपल्या पाटीशी आहे असे त्यांनी सांगितले.
            यावेळी जि.प.च्या माजी अध्यक्षा ॲड.निलिमा पाटील, डॉ.अश्विनी वैशंपायन यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शेवटी आभार सुहित जीवन ट्रस्टच्या संस्थापिका डॉ.सुरेखा पाटील यांनी केले. या कार्यशाळेस जिल्हयातील शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस, मोठया संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज