'मिसा'बंदींची माहिती पाठविण्याचे आवाहन


            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- सन 1975 ते 1977 या कालावधीत लोकशाहीसाठी लढा देतांना 'मिसाअंतर्गत'बंदिवास सोसलेल्या लोकांचा गौरव करण्याचे धोरण शासनाने ठरविले आहे. त्याअनुषंगाने ज्या व्यक्तींवर मिसाअंतर्गत कारवाई झालेल्या व्यक्तिंची माहिती शासनाने मागविली आहे. त्यात मिसाअंतर्गत कारवाई झालेल्या आंदोलकांनी शिक्षा झालेली कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेत जमा करावेत. तसेच ज्या मिसाबंदींचे निधन झाले असेल तर त्यांचे कायदेशीर वारस (पत्नी) व महिला असल्यास पती यांनी सदरची माहिती बुधवार दि.25 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य शाखेत जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज