ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवा उज्ज्वला योजना-पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण


अलिबाग, जि. रायगड, (जिमाका) दि.20- पंतप्रधान उज्वला योजना ही ग्रामीण भागातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना असून ही योजना ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी  पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी जे.एन.पी.टी.टाऊनशिप उरण येथे आयोजित ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत उज्वला दिवस कार्यक्रमात केले.
यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, जे.एन.पी.टी.चे विश्वस्त महेश बालदी, उरणाच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, प्रांताधिकारी श्री.नवले, तहसिलदार कल्पना गौड, उरण नगरपरिषदेचे नगरसेवक आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ना.चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान उज्वला योजना ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया दुर्बल महिलांनी घेतला पाहिजे. या योजनमुळे महिलांना एलपीजी गॅस व शेगडी मिळणार आहे. त्यामुळे चुलीवर जेवण बनविताना होणारा त्रास कमी होणार आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही. येणाऱ्या काळात देशातील साडेतीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये आज 44 ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते हा उपक्रम सुरु आहे. 2020 पर्यंत देशातील आठ कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. उज्वला दिवस हा एक अभिनव उपक्रम असून त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनी या योजनेत सहभाग घ्यावा. एलपीजी गॅसच्या वापरामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्यामुळे महिलांनी फावल्या वेळेत घरची आर्थिकस्थिती सधन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. उज्वला योजना ही महिलांसाठी एक चांगली भेट असून महिलांनी या योजनेचा प्रसार व प्रचार केला पाहिजे. या योजनेमुळे एक अभिनव भारत बनू शकतो असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज