अपंगासाठी मोफत संगणक व व्यावसायिक प्रशिक्षण सुविधा



        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- महाराष्ट्र शासन अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य् पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह  येथे अपंगांसाठी मोफत संगणक व व्यावसायिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहे. इच्छुक अपंग विद्यार्थ्यांकडून 31 जुलै 2018 पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत.
उपलब्ध अभ्यासक्रम व शैक्षणिक पात्रता-
1.सर्टीफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस.ऑफिस (संगणक कोर्स) किमान इयत्ता आठवी पास .
2.मोटार अँड आमेंचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज-(इलेक्ट्रिक कोर्स) किमांन इयत्ता नववी पास.
3.एम .एस. सी.आय. टी. (संगणक कोर्स)
4.वयोमर्यादा सोळा ते चाळीस वर्ष तसेच प्रशिक्षण कालावधी एक वर्ष
प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय.
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक,शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह,टाकळी रोड,म्हेत्रे मळा,गोदड मळ्याजवळ, मिरज ता.मिरज जि. सांगली पिनकोड 416410.दूरध्वनी-0233-222908 मोबाईल  9921212919,9922577561,9975375557 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पोष्टाने पाठवावेत किंवा  समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला,अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे दि.31 जुलै 2018 पूर्वी पोहचतील अशा बेताने पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल, गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज जि.सांगली यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत