छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना एक वेळ समझोत्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ


 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-   कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज  शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जादा थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (one time settlement) या योजनेला 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार एकवेळ समजोता योजनेखाली  पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम  भरण्याचा कालावधी दिनांक 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2018 पर्यंत वाढविण्यात आला आहे.  यापूर्वी ही मुदत 30 जून पर्यंत होती.  यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  तालुज्का उपनिबंधक/ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा व शासनाने वाढवलेल्या मुदतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज