जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79.69 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका)दि.16- जिल्ह्यात गेल्या 24 तासात
सरासरी 79.69 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1978.53
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 29.00 मि.मि., पेण-120.00
मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-119.20 मि.मि., उरण-25.00 मि.मि., कर्जत-93.00
मि.मि., खालापूर-64.00 मि.मि., माणगांव-85.00 मि.मि., रोहा-57.00 मि.मि., सुधागड-38.00
मि.मि., तळा-61.00 मि.मि., महाड-64.00 मि.मि., पोलादपूर-125.00 म्हसळा-75.60
मि.मि., श्रीवर्धन-42.00 मि.मि., माथेरान-262.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1275.80
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 79.69 मि.मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 62.96 टक्के इतकी
आहे.
00000
Comments
Post a Comment