महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा रायगड जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.20- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई विजय कांबळे (भा.पो.से.), विधी सदस्य न्यायमूर्ती सी.एल.थुल, सेवा सदस्य मधुकर गायकवाड, रमेश शिंदे हे सोमवार दि. 30   मंगळवार दि.31  रोजी  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
सोमवार दि.30 रोजी सायं.साडे सात वा. अलिबाग येथे आगमन व शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे मुक्काम.
मंगळवार दि.31 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा परिषद  रायगड मधील अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजना तसेच अनुसूचित जाती  जमाती भरती, बढती, अनुशेष बाबत आढावा बैठक, स्थळ :- जिल्हा परिषद सभागृह. दुपारी साडे बारा  वा. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांच्या समवेत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा, नागरी हक्क संरक्षण अन्याय/ अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा आढावा व लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आढावा, स्थळ :- जिल्हा परिषद सभागृह . दुपारी दोन ते तीन वा. दरम्यान राखीव. सायं. सोईनुसार मुंबईकडे रवाना.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत