दिव्यांग व्यक्तींना बुधवार पासून वैश्विक ओळखपत्र वितरण तालुकास्तरावर विशेष शिबीराचे आयोजन



अलिबाग, जि. रायगड, दि.4 :- राज्याचे अपंग कल्याण आयुक्त पुणे यांच्या सुचनेनुसार दिव्यांग व्यक्ती अस्मीता अभियान अंतर्गत  दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरण करण्यासाठी तालुकास्तरावर शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत.  त्यानुसार जिल्ह्यात तालुकास्तरावर दिव्यांगासाठी UDID (वैश्विक ओळखपत्र) देण्यासाठी शिबीर आयोजनाचे वेळापत्रक याप्रमाणे.
            बुधवार दि.06 रोजी पंचायत समिती अलिबाग,  गुरुवार दि. 7 रोजी मल्टी परपज हॉल, जे.एन.पी.टी.उरण,     सोमवार दि.11  रोजी पंचायत समिती पेण,     बुधवार दि.13 रोजी पंचायत समिती पनवेल,    शुक्रवार दि.15  रोजी  पंचायत समिती कर्जत,    शनिवार दि.16  रोजी पंचायत समिती खालापूर,    सोमवार दि.18  रोजी पंचायत समिती सुधागड,      बुधवार दि.20  रोजी पंचायत समिती रोहा,     गुरुवार दि.21  रोजी पंचायत समिती मुरुड,    शुक्रवार दि.22 रोजी पंचायत समिती माणगाव,    सोमवार दि.25 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती तळा,  मंगळवार  दि.26 रोजी पंचायत समिती म्हसळा,    बुधवार दि.27 रोजी पंचायत समिती श्रीवर्धन,     गुरुवार दि.28  रोजी पंचायत समिती महाड व  पंचायत समिती पोलादपूर येथे ही शिबीरे होतील.  ही सर्व शिबीरे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात होतील.  
            या शिबीराच्या आयोजनासाठी संबंधित गट विकास अधिकारी हे नोडल अधिकारी आहेत. त्यांनी सदर  शिबीराचे आयोजन पंचायत समिती कार्यालयाच्या तळ मजल्यावर करावे.  दिव्यांग व्यक्तींना शिबीराच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.    शिबीरासाठी उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी सोबत अपंगत्वाचा दाखला SADM पध्दतीचा, आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी मूळ कागदपत्रांसही सोबत आणावे.  दिव्यांग व्यक्तीच्या स्वाक्षरीची आवश्यकता असल्याने स्वत: दिव्यांग व्यक्ती शिबीरास उपस्थित राहणे आवश्यक आहे.  मात्र शारीरीक मर्यादामुळे दिव्यांग व्यक्तीस स्वत: शिबीरास उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांचे पालक किंवा पाल्यानी वरील मूळ कागदपत्रांसह व अपंग व्यक्तीच्या स्वाक्षरीच्या नमुन्यास उपस्थित राहावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी, अभय यावलकर यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज