माजी सैनिक/ माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2019 करीता शिष्यवृती



अलिबाग दि.31 जुलै :-  सन 2018-19 मघ्ये इयत्ता 10 वी  व 12 वी व पदवी/पदविका परिक्षेत किमान 60% गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेणा-या तसेच विद्यापिठाने मान्य केलेल्या विषयांमघ्ये संशोधनपर अभ्यासक्रम करणा-या (पीएचडी व तत्सम) माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत दर वर्षी शैक्षणिक श्ष्यिवृती देण्यात येणार आहे. सदर कामी माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी खाली नमूद केलेल्या कागदपत्रासह आपले अर्ज दिनांक 15 ऑक्टोबर 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सादर करावेत.
वैयक्तिक अर्ज. डी डी-40 अर्ज (कार्यालयात उपलब्ध आहे.) ओळखपत्राची पाटपोठ छायांकित प्रत. सद्या पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचे बोनाफाईड सर्टीफिकेट. उत्तीर्ण झालेल्या वर्गाच्या गुणपत्रिकेची प्रमाणित सत्यप्रत. डिसचार्ज पुस्तकातील कुटूंबातील सदस्यांची नावे असलेल्या पानांची प्रमाणित छायांकित प्रत. इतर कोणतीही शिष्यवृती मिळत नसलेबाबतचा कॉलेजचा दाखला. ही कागदपत्र अर्जासोबत जोडावी.
तरी  सदर संधीचा जिल्हयातील पात्र  माजी सैनिक/माजी विधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पद्मश्री एस. बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.  
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज