दिव्यांग मतदार नोंदणीसाठी जनजागृती आवश्यक -उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीम.वैशाली माने




अलिबाग,जि.रायगड दि.31-(जिमाका) आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने विधानसभा निवडणूकीत दिव्यांग मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग श्रीम.वैशाली माने यांनी आज दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित सुलभ निवडणूका जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी रामदास बघे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग रविकिरण पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प.जी.एम.लेंडी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी, अपंग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा जिल्हा युथ आयकॉन निवडणूक श्रीम.तपस्वी गोंधळी, प्रमोद गवई आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीम.माने म्हणाल्या की, मा.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार येणाऱ्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.  या समितीची दरमहा एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.  मागील लोकसभा निवडणूकीत दिव्यांग मतदार नोंदणी व सोयी-सुविधांबाबत काही त्रुटी राहिल्या असतील तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत त्या त्रूटींचे निराकरण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या दिव्यांग मतदारांची  नोंदणी होणे बाकी असेल त्यांची प्रत्येक तालुकानिहाय गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याचा सर्व्हे करुन दिव्यांग मतदार नोंदणीसाठी जास्तीत जास्त जनजागृती करावी.  स्वीप कार्यक्रमांतर्गतही दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा  व मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक