महसूल दिनानिमित्त अधिकारी/कर्मचारी यांचा गौरव सोहळा




अलिबाग दि.31 जुलै :-  1 ऑगस्ट पासून महसूली वर्ष सुरु होते. जिल्हा स्तरावरील महसूली कामे वेळच्यावेळी  पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांचा निपटारा करणे इत्यादी कामे वेळच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या आणि महसूल वसूलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरीता 1 ऑगस्ट हा दिवस महसूली दिन म्हणून साजरा करण्यांत यावा असे 19/07/2002 च्या शासन परिपत्रकान्वये निर्देश देण्यांत आलेले आहेत.
त्या अनुषंगाने सन 2018-19 या वर्षीचा महसूल दिन 1 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता ॲग्लो इस्टर्न मेरिटाईम अकॅडमी खांडपे, ता.कर्जत जि.रायगड येथे आयोजित करण्यांत आलेला आहे. या महसूल दिनाला सन 2018-19 या महसूली वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा गौरव सोहळा व महसूल अधिकारी/कर्मचारी यांच्या पाल्यांनी सन 2018-19 या वर्षात शैक्षणिक / सांस्कृतिक / क्रिडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत त्यांचाही सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक