अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन
अलिबाग,जि.रायगड, दि. 11 (जिमाका) :- शासनाच्या
परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरू आहेत. अशा अनधिकृत शाळा शैक्षणिक वर्ष 2020-21
मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय संबंधित सुरू करू नयेत तसेच अशा
अनधिकृत प्राथमिक शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी
यांनी आरटीई 2009 च्या कायद्याप्रमाणे व महाराष्ट्र शासन नियमावली 2011 नुसार उचित
कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग
यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पालकांनी
आपल्या पाल्यास अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे या अनधिकृत प्राथमिक शाळेत प्रवेश
घेऊ नये. अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य
मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास पालक जबाबदार राहतील, याची सर्व पालकांनी नोंद
घ्यावी, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी कळविले
आहे.
या अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी खालीलप्रमाणे-
1) वेदांत
पब्लिक स्कूल, कळंबोली, पनवेल, 2) ए.डी. कोली शिक्षण प्रसारक संस्था, ज्ञानाई
माध्यमिक विद्यालय धामणी, पनवेल, 3) शारदादेवी इंग्लिश मीडियम स्कूल, पनवेल 4)
पराशक्ती इंग्लिश मीडियम स्कूल, कोपर, पनवेल 5) कळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल,
तळोजे, पाचनंद, पनवेल 6) अकर्म इंग्लिश स्कूल, तळोजे, पनवेल 7) मार्शमेलो
इंटरनॅशनल स्कूल, ओवे, पनवेल 8) जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, इंग्लिश मीडियम
स्कूल, मोरा, उरण 9) बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल, करंजा रोड, उरण 10)
डॉ.ए.आर.उंड्रे इंग्लिश मीडियम स्कूल, बोर्ली, मुरुड 11) मोहन धारिया इंग्लिश
मीडियम स्कूल, वरंध, महाड 12) आयडियल इंग्लिश स्कूल, महाड 13) इकरा इस्लामिक स्कूल
अँड मकतब इकरा स्कूल, म्हसळा 14) इतकान एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, इतकान
इंग्लिश स्कूल, गोंडघर, म्हसळा 15) इकरा एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल,
लिपनी वावे, उर्दू , पो. पांगळोली, म्हसळा 16) श्री सुरेश कुडेकर एज्युकेशन
सोसायटी, सुरेश जी कुडेकर इंटरनॅशनल स्कूल, म्हसळा 17) कोकण एज्युकेशन अँड
वेल्फेअर सेंटर, अल हसन इंग्लिश स्कूल, म्हसळा 18) एंजल न्यू इंग्लिश स्कूल, कशेळे,
कर्जत 19) शार्विल सीबीएससी स्कूल ऑफ एक्सलन्स, नेरळ, कर्जत
याबाबत अधिक
माहितीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याशी संपर्क
साधण्यात यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment