निसर्ग चक्रीवादळामुळे मुरुड तालुक्यात झालेल्या नुकसानीची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग,जि.रायगड, दि. 11 (जिमाका) :- जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुरुड तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची,
झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर
नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी काल (दि.10
जून रोजी) कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह मुरुड
तालुक्यातील आगरदांडा, मुरुड शहर, काशीद बीच या भागातील नुकसान झालेल्या ठिकाणांची
पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रांताधिकारी श्रीमती शारदा पोवार, जिल्हा कृषी
अधीक्षक पांडूरंग शेळके, मंगेश दांडेकर, आतिफ खातीब उपस्थित होते.
याशिवाय रेवंदडा, रेवदंडा बंदर, चौल, शितळादेवी या ठिकाणीही
पाहणी दरम्यान पालकमंत्री कु.तटकरे यांनी नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी श्रीमती शारदा पोवार, प्रतिक्षा राऊत,
प्रविण राऊत, आशिष भट, ऋषी भगत हे उपस्थित होते.
येथील पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी
रेवदंडा येथे पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.
00000
Comments
Post a Comment