पनवेल तालुक्यातील नांदगाव (भगतआळी) परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित



अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील नांदगाव (भगतआळी)  येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले मौजे नांदगाव (भगतआळी)   पो.पळस्पे, ता.पनवेल येथील क्रांती रसिक भगत यांचे घर, पूर्वेस रमेश बाळकृष्ण हुद्दार यांचा बंगला,  पश्चिमेस परशुराम खंडू भगत यांचे घर, दक्षिणेस रसिक राम भगत यांचा बंगला, उत्तरेस रघुनाथ हरिश्चंद्र भगत यांचा बंगला हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज