केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 च्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार संधी

 


अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार  व उद्योजकता विभागाद्वारे राबविण्यात येणारी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 च्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य प्रशिक्षण व तदनंतर कौशल्य प्रमाणपत्र व रोजगार, स्वयंरोजगार संधी प्राप्त होणार आहे. 

 तरी कौशल्य प्रशिक्षण घेण्यास पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSft8cX_DKR7jJG6407Dc7vh__Wttz0iTCmy0oHCUBhKPZe4w/viewform?usp=pp_url या लिंक च्या माध्यमातून करावी. तसेच ज्या उमदेवाराना ऑनलाईन लिंक च्या माध्यमातून नोंदणी करणे शक्य नसेल त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग वैभव निवास,भंडार आळी, चेंढरे, अलिबाग.येथे ऑफलाईन फॉर्म भरून नोंदणी करावी.

 उमेदवारांनी नोंदणी केल्यानंतर संबंधित प्रशिक्षण संस्थेद्वारे आपली पात्रता व इच्छुकता तपासून आपली निवड अंतिम करण्यात येईल, असे  सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, श्री.पवार यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज