कृषी विभागाची Autoreply व्हाट्सअप सुविधा कार्यान्वित

 


 

अलिबाग, जि.रायगड,दि.25 (जिमाका):- कृषी विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती शेतकऱ्यांना मोबाईल मध्येच तात्काळ मिळावी, याकरिता व्हाट्सअप Autoreply ची सुविधा सुरू करण्यात आली आहे..   

 मोबाईलवर कृषी विभागाच्या योजनांची माहिती मिळविण्यासाठी 8010550870 या व्हाट्सअप क्रमांकावर नमस्कार किंवा Hello हा शब्द टाईप करून पाठविल्यास आपणास स्वागत संदेश प्राप्त होतो. त्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द दिलेले आहेत.उदाहरणार्थ well, Mech, Hort.इत्यादी शब्द टाईप करून वरील क्रमांकावर पाठविल्यास आपणास पाहिजे असणाऱ्या योजनेची माहिती उपलब्ध होते.

   तरी या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज