प्रजासत्ताक दिनी क्रीडा पुरस्कारप्राप्त दोन जणांचा पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या हस्ते सत्कार

 

      अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):- जिल्हयातील गुणवंत खेळाडू पुरस्कार, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणि गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हयातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांच्याकरिता शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला जातो.

     जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील श्री.संदिप प्रल्हाद गुरव व पनवेल येथील श्री.देविदास महादेव पाटील या पुरस्कारार्थी खेळाडूंना प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

श्री.संदिप प्रल्हाद गुरव यांनी थायलंड येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड तसेच व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट् कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) हा पुरस्कार मिळविला आहे.

तसेच श्री.देविदास महादेव पाटील अपंगत्वावर मात करुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कॅनॉईंग अँड कयकिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारत देशाचे व रायगडचे नाव उज्वल केले आहे. तसेच रोईंगमध्ये एशियन पॅरा ऑलम्पिकसाठी भारतीय संघाच्या कॅम्पसाठी शासनाच्या साई सेंटर मध्ये राष्ट्रीय कॅम्प मध्ये निवड झाली आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज