शासकीय माध्यमिक आश्रमशाळा साईसाठी पनवेलमधील मौजे डोलघर येथील जागा हस्तांतरित

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.3,(जिमाका) :- पनवेल तालुक्यातील मौजे डोलघर येथील स.नं.82/1 क्षेत्र 53-21-00 हेक्टर आर. पैकी क्षेत्र 70 एकर सरकारी परीघ जमीन एकलव्य रेसिडन्सी स्कूल, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी सुरु करणे, लिडरशीप डेव्हलपमेंट ॲकडमी व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा साई या शाळेसाठी उपलब्ध व्हावी, याकरिता विनंती करण्यात आली होती. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा साई ही भाडे तत्वावरील जागेत सुरु होती. मात्र शासकीय आश्रमशाळांची स्वत:ची इमारती असावी, या उद्देशाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाचा पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासनास त्याप्रमाणे निर्देश दिले.

            त्यानुषंगाने या आश्रमशाळेसाठी  पनवेल तालुक्यातील मौजे डोलघर येथील स.नं.82/1 क्षेत्र 53-21-00 हेक्टर आर. पैकी क्षेत्र 2-00-00 हेक्टर आर सरकारी परीघ जमीन महसूल मुक्त व सारामाफीने जागा हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतेच पारित केले आहेत.

            शासकीय कार्यालये, शासकीय शाळा यांच्यासाठी स्वतःची शासकीय वास्तू असावी,यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जातीने लक्ष देऊन अनेक शासकीय कार्यालयांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक