अलिबाग तालुक्यातील रंगीत छायाचित्र मतदारयादीत नसलेल्या मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र दि.30 जून पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे जमा करावेत

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :-192-अलिबाग विधानसभा मतदारसंघातील अलिबाग तालुक्यातील मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

       तरी ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदारयादीत नाही, अशा मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र दि. 30 जून 2021 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत.जे मतदार आपले रंगीत छायाचित्र जमा करणार नाहीत, अशा मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा अलिबाग उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत ढगे व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा अलिबाग तहसिलदार श्री.सचिन शेजाळ यांनी केले आहे.

       192-अलिबाग विधानसभा मतदारसंघात अलिबाग तालुक्यात एकूण 266 मतदार यादी भाग असून एकूण मतदारांपैकी 5 हजार 868 मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदारयादीत नसल्याचे आढळून आले आहे.

      मतदारांची छायाचित्रे गोळा करण्याचे काम मतदार केंद्रस्तरीय अधिकारी करीत आहेत. मतदारयादीतील छायाचित्र नसलेल्या स्थलांतरीत मतदारांच्या मतदार यादीतील पत्त्यावर जाऊन जे मतदार यादीतील पत्त्यावर आढळले नाहीत, त्याबाबत पंचनामे तयार करण्यात आलेले आहेत.   

     ज्या मतदारांची रंगीत छायाचित्रे मतदारयादीत नाहीत, अशा मतदारांच्या नावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या raigad.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहेत.

     या संकेतस्थळावर तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे असलेल्या मतदार यादीतील आपले आणि आपल्या परिचयातील मतदारांचे नाव यादीमध्ये असल्यास तात्काळ रंगीत छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा तहसिल कार्यालय अलिबाग येथे जमा करण्यात यावे.

      ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदारयादीत नाही, अशा मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र दि. 30 जून 2021 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अलिबाग श्री.प्रशांत ढगे व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार अलिबाग श्री.सचिन शेजाळ यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक