बोगस नियुक्ती पत्रांना बळी न पडण्याचे रत्नागिरी पर्यटन महामंडळाचे आवाहन
अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- कोणीतरी अज्ञात
व्यक्ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोगस लेटर हेडचा व शिक्क्याचा वापर करुन
काही उमेदवारांना नोकरी बाबतची नियुक्ती पत्रे देत असल्याची बातमी दिसून आली आहे.
महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळ कोकण विभाग यांच्यामार्फत कोणत्याही पध्दतीची नोकर भरती जाहिरात
प्रसिध्द केली नाही व कोणत्याही उमेदवारांची नियुक्ती देखील महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळ कोकण विभागाकडून केलेली नाही. अज्ञातामार्फत गरजू उमेदवारांना गाठून अशा बोगस
नियुक्ती पत्राआधारे गरजू उमेदवारांची आर्थिक व मानसिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता
येत नाही.
तरी
अशा बोगस नियुक्तीपत्रांना व जाहिरातींना बळी
पडू नये. ज्या उमेदवारांची फसवणूक झाली असेल त्यांनी संबंधिताविरुध्द तक्रार
दाखल करावी व याबाबत काही आवश्यक माहिती हवी असल्यास प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळ, रत्नागिरी कोकण विभाग, जिल्हधिकारी कार्यालय आवार, ए विंग, पहिला
मजला, जयस्तंभ, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळ प्रा.का. रत्नागिरी (कोकण विभाग) श्री.दिपक माने यांनी केले आहे.
Comments
Post a Comment