रमाई घरकुल योजनेचा गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा --सहाय्यक आयुक्त, सुनिल जाधव

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.13,(जिमाका):-अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी रमाई घरकुल योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील गरजू लाभार्थ्यांनी सन 2021-22  मध्ये रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अर्जाकरिता ग्रामीण भागासाठी पंचायत समिती आणि शहरी भागासाठी नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचातीमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड-अलिबाग सुनिल जाधव यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज