वय 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींना भारतीय डाक विभागात विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सूवर्णसंधी
अलिबाग,जि.रायगड,दि.03
(जिमाका) :- केंद्र शासनाच्या
ग्रामीण डाक जीवन व डाक जीवन विम्याच्या ग्रामीण व शहरी क्षेत्रांमध्ये विमा प्रतिनिधी
म्हणून काम करण्याची सूवर्णसंधी आता सुशिक्षित तरुण-तरुणींना त्यासोबतच वय 18 ते 50
वयोगटातील सर्वांनाच उपलब्ध झाली आहे. विमा प्रतिनिधींची नेमणूक अधीक्षक डाकघर,
रायगड विभाग अलिबाग यांच्यामार्फत दि. 09 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवाराने
अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल
नंबर, ई-मेल आयडी तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रांच्या
मूळ प्रती घेऊन मुलाखतीला हजर राहणे गरजेचे आहे.
कोणत्याही कंपनीचे
माजी विमा प्रतिनिधी/ माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ
सदस्य-कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक,
बेरोजगार/ स्वयंरोजगार असणारे तरुण, तरुणी किंवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवाराना
ही सूवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे
ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे. उमेदवाराची निवड 10 वी, 12
वी च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणिक पात्रता व मुलाखती मिळालेल्या गुणांवर केली जाईल.
ज्यांना अर्ज
पाठवायचे असतील त्या उमेदवाराने त्यासोबत जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता,
आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर, इमेल आयडी, तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास
त्याबाबतची कागदपत्रे पाठवावीत. आपले अर्ज रजिस्टर/ स्पीड पोस्टद्वारे, साध्या
कागदावर शैक्षणिक पात्रता व संबंधित प्रमाणपत्राच्या प्रतींसह लिफाफ्यावर डाक जीवन विमा/ग्रामीण डाक जीवन विमा एजटची नियुक्ती असे लिहून अधीक्षक डाकघर, रायगड
विभाग, अलिबाग 402201 यांच्या नावे दि. 11 नोव्हेंबर 2021 या कार्यालयास मिळतील
असे पाठवावे. त्यांची मुलाखत दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास रु 5 हजारची अनामत ठेव ठेवावी लागेल. या क्षेत्रामध्ये त्यांच्या कामाचा मोबदला
कमिशन स्वरूपात दिला जाणार आहे.
भारतीय डाक
विभागासोबत काम करण्याच्या या सूवर्णसंधीचा लाभ तरुण, तरुणींनी करून घ्यावा, असे आवाहन
रायगड डाक विभागाचे अधीक्षक श्री. ए. जी. पाखरे यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment