माणगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात 01 डिसेंबर विश्व एड्स दिवस साजरा

 


 

अलिबाग,दि.02 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर ता.माणगाव येथे  (दि.01 डिसेंबर 2022) रोजी विश्व एड्स दिवस स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांच्या वतीने  साजरा करण्यात आला.  प्रभातकालीन प्रार्थना सभेत स्काऊट अँड गाईडच्या विद्यार्थ्यांनी एड्स आजाराविषयी तसेच एड्स आजार  वाढीची कारणे आणि एड्स आजारापासून आपल्याला, समाजाला कसे सुरक्षित राहता येईल, या विषयावर विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.

एड्स या आजारावर विद्यार्थ्यांकडून प्रश्नमंजुषा घेण्यात आली. स्काऊटचे विद्यार्थी संचित कासारे, मयुरेश पाटील, गौरव बहिरम, यश तांडेल व सिद्धार्थ घरत  या विद्यार्थ्यांनी प्रभातकालीन प्रार्थना सभेत आपला सहभाग नोंदविला.

 विद्यालयाचे प्राचार्य श्री.के.वाय.इंगळे, विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री.गणेश आडोडे व समस्त शिक्षक वृंद प्रार्थना सभेत उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज