जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जलतरण तलाव खेळाडू तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु
अलिबाग,दि.02 (जिमाका) : जिल्हा क्रीडा
कार्यालय, नेहुली अलिबाग येथे असलेला 25 x21 मीटर आकाराचा जलतरण तलाव निवडणूक व कोविडमुळे
सन 2018 पासून बंद होता. आता जिल्हाधिकारी
डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार हा जलतरण तलाव खेळाडू तसेच सर्वसामान्य
नागरिकांसाठी सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा
कार्यालयाने या जलतरण तलावाची योग्य ती दुरुस्ती व साफसफाई करुन घेतली असून आता
नागरिकांसाठी हा तलाव सुसज्ज झाला आहे. या
तलावामध्ये पोहण्याकरिता शालेय/महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांकरिता शुल्क रु.500 व
इतर नागरिकांसाठी रु.750 असे राहील.
तलावामध्ये
पोहण्यासाठी येताना पोहता येणे आवश्यक असून त्याबाबतचे हमीपत्र, आधारकार्ड व फिटनेस
प्रमाणपत्र ही कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अलिबाग तालुक्यातील
तसेच इतर तालुक्यतील नागरिकांनी अधिक माहितीसाठी अभिजित भगत यांच्या मो.9881674298 वर संपर्क साधावा आणि
जास्तीत जास्त खेळाडूंनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment