मुरुड येथील वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबीर संपन्न

 


 

अलिबाग,दि.01 (जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र " गरुडझेप" मार्फत उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी,अलिबाग प्रशांत ढगे  व तहसिलदार रोहन शिंदे यांच्या पुढाकारातून वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, मुरुड येथे पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 200 विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये मुरुड-जंजिरा निवडणूक नायब तहसिलदार, अमित पुरी, मुरुड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन वाणी व पोलीस कर्मचारी परेश म्हात्रे यांनी प्रशिक्षणार्थींना पोलीस भरतीच्या अनुषंगाने परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे, पुस्तकांची उपलब्धता, पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व शारिरीक क्षमता चाचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांना गरुडझेप स्पर्धा परीक्षा उपक्रम आणि गरुडझेप ॲपची माहिती देण्यात आली तसेच हे ॲप डाऊनलोड कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज