सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पाली-सुधागड येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु


 

 

अलिबाग, दि.24(जिमाका):- सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हे मधली आळी, राम मंदिर रोड तळ्याशेजारी ता.पाली-सुधागड, जि. रायगड येथे कार्यरत आहे.

या वसतिगृहामध्ये इयत्ता 8 ची पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच  भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो.

अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील  विनामुल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो.  शालेय विद्यार्थीनींना रुपये 1 हजार व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना रुपये 2 हजार गणेश भत्ता दिला जातो. सर्व विद्यार्थीनींना छत्री, रेनकोट व गमबुटसाठी रु.500/- भत्ता दिला जातो.  तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्य भत्ता रुपये 4 हजार व प्रोजेक्ट भत्ता रुपये 1 हजार दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रिडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थींनीकरिता रुपये 2  लाख 50 हजारचे आत, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, विद्यार्थीनींकरिता रुपये 1 लाखाच्या आत असावे.

ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2022-23 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र,  मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक, आधारकार्ड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहेत. अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली-सुधागड श्रीमती एम.जे.नरहरे यांच्याशी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती एम.जे.नरहरे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज