जिल्हा कोषागराकडून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी सन 2023-24 पासून नवीन आयकर प्रणाली लागू
अलिबाग,दि.24(जिमाका):- रायगड जिल्हा कोषागराकडून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी सन 2023-24 पासून नवीन आयकर प्रणाली लागू करण्यात आली आहे. जे निवृत्तीवेतनधारक आयकर कपात पात्र आहेत (ज्यांचे वार्षिक निवृत्तीवेतन रु.सात लाखापेक्षा जास्त अधिक आहे, असे निवृत्तीवेतनधारक) अशा निवृत्तीवेतनधारकांचे नियमानुसार आयकर कपात त्यांच्या निवृत्तीवेतनातून माहे जून 2023 पासून करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांना जुनी आयकर प्रणाली स्वीकारायची आहे त्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी (सन 2023 -24) केलेल्या गुंतवणुकीच्या तपशीलासह जुनी आयकर प्रणाली स्वीकारण्याबाबतचा लेखी अर्ज जिल्हा कोषागार कार्यालयाकडे त्वरित सादर करावा. अर्ज तपशील सादर न केल्यास, नियमानुसार आयकर कपात निवृत्तीवेतनातून करण्यात येईल. निवृत्तीवेतनधारकांनी सदरची माहिती तात्काळ कोषागार सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.
००००००००
Comments
Post a Comment