रोव्हर मशीनव्दारे मोजणी प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

 

 

अलिबाग,दि.23 (जिमाका) :- भूमी अभिलेख विभागात अचूक व जलद गतीने मोजणी करण्यासाठी रोव्हर मशीन पुरविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये पुरविण्यात आलेल्या रोव्हर मशीनव्दारे मोजणीचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी रायगड डॉ.  योगेश म्हसे यांना दि. 20 मे 2023 रोजी अलिबाग तहसिलदार कार्यालयाच्या आवारात दाखविण्यात आले.

यावेळी अलिबाग उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत ढगे, अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील व उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री.भोला कोकणे तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री.भोला कोकणे यांनी रोव्हर मशीनव्दारे कमी वेळेत आणि अचूक पद्धतीने मोजणीचे प्रात्यक्षित तसेच D.G.P.S (रोव्हर व बेस) (Differential Global Positioning System) यंत्राद्वारे भू-करमापक (सर्वेअर) यांनी घेतलेली अक्षांश रेखांक्ष याचा वापर करुन सद्य:स्थितीत इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संगणक प्रणालीव्दारे KML Files तयार करणे शक्य झाले आहे.

राज्यात 77 ठिकाणी CORS - Stations स्थापित करण्यात आली आहेत. यापैकी रायगड जिल्ह्यातील उरण व माणगाव तालुक्यात अशा दोन ठिकाणी केंद्र स्थापित केले आहेत. या मशीनमुळे भूसंपादन मोजणी, नागरिकांच्या अर्जावरील मोजणी, शासकीय मोजणी आणि इतर मोजणी कामे जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी रायगड जिल्ह्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणे जलद गतीने निकाली करण्यासाठी रोव्हर मोजणी मशीनचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज