सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी पुष्पहार अर्पण करुन केले अभिवादन

 


 

अलिबाग,दि.04 (जिमाका) :- गज फाऊंडेशन आणि अलिबाग नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या 294 व्या पुण्यतिथीनिमित्त आंग्रे स्मारक परिसर, अलिबाग येथे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

               यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे, पश्चिमी नौसेना कमांडर मुख्यालय, भा.नौ.पो.आंग्रे चे कमांडिंग ऑफिसर कंमाडर श्री.आदित्य हाडा, कंमाडर श्री.प्रशांत गोजर, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज