आधार नोंदणी आणि अद्यतनसाठी शिबिराचे आयोजन करू इच्छिणाऱ्या संस्था, कंपनी, असोसिएशन व्यक्तींना संपर्क साधण्याचे आवाहन

 

अलिबाग,दि.05(जिमाका):- नाशिक, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पोस्ट ऑफिसने आयोजित केलेल्या विशेष शिबिरांद्वारे नागरिकांना आधार नोंदणी आणि अद्यतन (अपडेट) सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र यांनी दिले आहेत.  गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट असोसिएशन, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा इतर कोणत्याही संस्था/व्यक्तींकडून प्राप्त झालेल्या मागणी/ विनंतीवर सेवा प्रदान केली जाईल.

गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट असोसिएशन, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा इतर कोणत्याही संस्था/व्यक्तींकडून मागणीनुसार आधार शिबिरे पोस्ट ऑफिसद्वारे आयोजित केली जातील.  जर शिबिरे आयोजित करण्याची मागणी प्राप्त झाली आहे आणि आधार नोंदणी/ अपडेटेशनचे किमान 100 व्यवहार होतील, अशी खात्री दिली आहे, अशी शिबिरे कोणत्याही सोसायटीमध्ये होऊ शकतात. संस्था, कंपनी असोसिएशन अशा शिबिराचे आयोजन करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी शिबिराचे आयोजन प्रस्तावित असलेले ठिकाण संपूर्ण तपशिलासह सहाय्यक संचालक, पोस्टल सेवा, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, नवी मुंबई क्षेत्र, 2 रा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत, सेक्टर-19 पनवेल, दू.क्र.022-27482724 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप कॉल/ मेसेज पाठवता येईल (ई-मेल: bdnmr.mh@indiapost.gov.in) येथे संपर्क साधावा.

या शिबिरात आवर्ती ठेव (RD), सुकन्या समृद्धी खाती (SSA), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि महिला सन्मान बचत प्रमाणपत्रे (MSSC) इत्यादीसारखी नवीन पोस्ट ऑफिस बचत बँक खाती उघडण्याचे फॉर्म देखील स्वीकारले जातील, असेही डाक अधीक्षक डॉ.संजय लिये यांनी कळविले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज