उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित चार हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार राज्यातील पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री रायगड जिल्ह्यातील 4 उद्योगांना राज्य निर्यात पुरस्कार प्रदान

 


 

रायगड(जिमाका)दि.8:- उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे 5 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील मे.नाईक ओशियनिक एक्सपोर्टस् प्रा.लि., एम,5,एमआयडीसी,तळोजा,मे. एच के एस एमपेक्स,प्लॉट नं3, पनवेल इंडस्ट्रीयल को-ऑप इस्टेट लि., नवी मुंबई फायनरी, मे.गंधार ऑईल  फायनरी (इंडिया), टी-10, एम.आय.डी.सी. तळोजा ता. पनवेल, मे. कपुर ग्लास इंडिया प्रा. लि.,200/201/212जवाहर को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट,कामोठेपनवेल या घटकांना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात  आले.

पुरस्कारार्थीचे अभिनंदन करून ते म्हणाले, पुरस्काराला अन्ययसाधारण महत्व असून पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्था यांचा आदर्श घेऊन राज्यातील इतरांनी उद्योग उभारले पाहिजे, त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हा पुरस्कार देण्यामागचा हेतू असतो. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी उद्योजकांची समिती गठीत करण्याची सूचना केली. पुरस्काराचे प्रस्ताव समितीकडे देण्यात यावे, प्रस्तावाच्या अनुषंगाने समितीच्या प्राप्त सूचना विचारात घेऊन आगामी काळात पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, असेही उद्योग मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज