उप जिल्हा रुग्णालय रोहा येथील डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक आणि रक्त साठवणूक केंद्राचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.12 :- करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून ऑक्सिजनची वाढती गरज भागविणे आवश्यक असल्याने उप जिल्हा रुग्णालय रोहा येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक असलेली यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, प्रांताधिकारी
यशवंत माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, मयूर दिवेकर, आरोग्य सभापती अहमद
शेख दर्जी, पंचायत समिती सभापती गुलाबताई वाघमारे तसेच मधुकर पाटील, विनोद पाशिलकर,
विजय मोरे, महेंद्र गुजर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहा तालुक्यातील रुग्णांना रक्ताची गरज लागल्यास अलिबाग, माणगाव,
महाड येथील रक्तपेढीकडून रक्त आणावे लागत होते. खाजगी रूग्णालयामधील शस्त्रक्रिया,
गरोदर माता व ॲनिमियाच्या रुग्णांसाठी रक्तपुरवठ्याच्या कमतरतेमुळे अडचण येत होती.
त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे डयुरासिल
लिक्विड ऑक्सिजन टँक आणि रक्त साठवणूक केंद्राचे
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या
हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी उच्च प्रवाह मेजर
कन्स्टेन्टरची पाहणी केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैद्यकीय अधीक्षक
डॉ. अंकिता मते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाणे, डॉ.देशमुख, डॉ. गोमसाळे, डॉ.आदिती
जोगळेकर, डॉ.प्रथमेश बुधे, डॉ.सलमा मुकादम, तसेच सिस्टर इन्चार्ज म्हात्रे, शेवडे,
बुधे, ब्लड बँक लॅब टेक्निशियन व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
0000000
Comments
Post a Comment