चेंढरे ग्रामपंचायत मध्ये "जागतिक हात धुवा दिवस" साजरा
अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- येथील चेंढरे ग्रामपंचायतमध्ये आज जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच यतीन घरत, ग्रामविकास अधिकारी निलेश गावंड, सुरेश पाटील, रविकिरण गायकवाड, दत्तात्रय नाईक, श्रीमती रुपाली नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला झाला.
यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी उपस्थितांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविले व हात धुण्याचे महत्वही सांगितले.
000000

Comments
Post a Comment