"माझे कुटुंब-माझी जबाबदारी”बक्षीस योजनेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरींचे आवाहन

 


    अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :-    राज्यातील कोविड-19 रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि को-मॉर्बिड आजारी व्यक्तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी व जनजागृती करण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यात "माझे कुटुंब माझी जबाबदारी  ही मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान आता शासनाने "माझे कुटुंब-माझी जबाबदारी " मोहीम बक्षिस योजना राज्यात प्रत्येक जिल्हयात राबविण्याचाही निर्णय घेतला आहे.

             ही बक्षिस योजना व्यक्ती आणि संस्थांसाठी आहे. जिल्हास्तरावर ही बक्षिस योजना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार असून, महानगरपालिका स्तरावर,महानगरपालिका आयुक्तांमार्फत तर आमदार मतदारसंघ स्तरावर उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.या स्पर्धेतील बक्षीस योजना दोन प्रकारच्या आहेत. यामध्ये योजनेतील सर्व स्पर्धाचे ऑनलाईन आलेले साहित्य तपासून गुणानुक्रमांक देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक स्तरावर समिती नेमून त्या समितीमार्फत गुणानुक्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.  स्पर्धेतील पहिल्या बक्षीस योजनेमध्ये व्यक्तींसाठीच्या योजनेमध्ये निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इ. स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच दुस-या स्पर्धेमध्ये संस्थांसाठी वेगवेगळया संस्थांच्या कामकाजानुसार बक्षिस योजना राबविण्यात येईल.

             "माझे कुटुंब- माझी जबाबदारी" ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांच्याकडून वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.     

        त्यामधील बक्षीस योजना समितीमध्ये समिती प्रमुख, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड-अलिबाग, श्रीम.वैशाली माने, व सहाय्यक समिती प्रमुख म्हणून सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड- अलिबाग, गोविंद वाकडे यांची नेमणूक करण्यात आली असून या योजनेंतर्गत कोविड-19 च्या "माझे कुटुंब- माझी जबाबदारी " ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

        या योजनेंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा याप्रमाणे स्पर्धाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करुन घेण्यात येतील.

निबंध स्पर्धा :- इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता करोना व प्रतिबंधात्मक काळजी तर इयत्ता 11 वी ते इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता "करोना- जागतिक महामारी" या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेचे निकष- स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेमध्ये ऑनलाईन सादरीकरण करण्याची अंतिम दि. 23 ऑक्टोबर 2020 राहील.  स्पर्धेमध्ये यशस्वी प्रथम तीन क्रमांकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल. याबाबत काही शंका असल्यास सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, मो.नं.9762813831 वर संपर्क साधावा. निबंध लिहून झाल्यानंतर स्कॅन करुन PDF स्वरुपात dydeoraigad@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. निबंध स्पर्धेमध्ये भाग घेणा-या विद्यार्थ्यांने दिलेल्या विषयावर 500 शब्दांमध्ये फक्त मराठी भाषेमध्ये स्व-हस्ताक्षरात निबंध कागदाच्या एकाच बाजूला लिहावा. पाठपोट लिहू नये. निबंधावर विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तालुक्याचे नाव, विद्यार्थ्यांचा/पालकाचा संपर्क क्रमांक व शाळेच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक निबंधाच्या शेवटी नमूद करावा.

वक्तृत्व स्पर्धा :- इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता "करोना-कुटुंब लढेल,देश जिंकेल" तर इयत्ता 11 वी ते इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता "लॉकडाऊन-अनलॉकडाऊन"  या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेचे निकष :-  स्पर्धांमध्ये रायगड जिल्हयातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेमध्ये ऑनलाईन सादरीकरण करण्याचा अंतिम दि. 23 ऑक्टोबर 2020 राहील.  स्पर्धेमध्ये यशस्वी प्रथम तीन क्रमांकाना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल.  याबाबत काही शंका असल्यास सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, मो.नं.9762813831 वर संपर्क साधावा. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणा-या विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयावर तीन मिनिटांचा वक्तृत्वाचा व्हिडीओ तयार करावा.  सुरुवातीला विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तालुक्याचे नाव, विद्यार्थ्यांचा / पालकाचा संपर्क क्रमांक व शाळेच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक भाषणाच्या सुरुवातीला नमूद करावा.  व्हिडीओ दिलेल्या मुदतीत dydeoraigad@gmail.com या ई-मेलवर पाठवावा.

            पोस्टर स्पर्धा :-  इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता माझे कुटूंब-माझी जबाबदारी तर इयत्ता 11 वी ते इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता "करोनाशी लढा-आपली सामाजिक जबाबदारी" या विषयांवर पोस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेचे निकष  :-  स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या  सर्व शाळांतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेमध्ये ऑनलाईन सादरीकरण करण्याचा अंतिम दि. 23 ऑक्टोबर 2020 राहील.  स्पर्धेमध्ये यशस्वी प्रथम तीन क्रमांकाना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल.  याबाबत काही शंका असल्यास सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, मो.नं.9762813831 वर संपर्क साधावा.  या स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकाने 20 से.मी. X 28 से.मी. आकाराचा कागद घेऊन त्यावर स्वत: पोस्टर काढावे,  रंगवावे, ते पोस्टर स्कॅन करुन PDF किंवा JPGE स्वरुपात dydeoraigad@gmail.com या ई-मेलवर पाठवावा.

            चित्रकला स्पर्धा :-  इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता "कुटुंबाची साथ करोनावर मात"  तर इयत्ता 11 वी ते इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता करोना प्रतिबंधासाठी घ्यावयाची दक्षता या विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे.

     स्पर्धेचे निकष  :- स्पर्धामध्ये रायगड जिल्हयातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. A स्पर्धेमध्ये ऑनलाईन सादरीकरण करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर 2020 राहील.  स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या प्रथम तीन क्रमांकाना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल. याबाबत काही शंका असल्यास सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, मो.नं.9762813831 यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकाने 40 सें.मी. X 50 सें.मी. आकाराचा कागद घेऊन त्यावर स्वत: चित्र काढावे, रंगवावे, ते चित्र स्कॅन करुन PDF किंवा JPGE स्वरुपात dydeoraigad@gmail.com या ईमेलवर पाठवावे.

             या स्पर्धांसाठी बक्षिसाचे स्वरूप राज्यस्तर-  पहिले बक्षिस, रु.10 हजार, दुसरे-रु.5 हजार, तिसरे-रु.3 हजार.  जिल्हास्तर-  पहिले बक्षिस, रु.5 हजार, दुसरे-रु.3 हजार, तिसरे-रु.2 हजार.  महानगरपालिका स्तर-  पहिले बक्षिस, रु.5 हजार, दुसरे-रु.3 हजार, तिसरे-रु.2 हजार.   आमदार मतदारसंघ स्तर- पहिले बक्षिस, रु.3 हजार, दुसरे-रु.2 हजार, तिसरे-रु.1 हजार, असे राहणार आहे.

संस्थांसाठीच्या बक्षिस योजना :-

       जिल्हास्तरावर नागरी आणि ग्रामीण असे 2 विभाग असतील. प्रत्येक विभागात प्रथम 3 संस्था निवडण्यात येतील व त्यांना बक्षिस दिले जाईल. संस्थेचा गुणानुक्रम काढण्यासाठी पुढीलप्रमाणे निकष असतील.

     मोहीम पहिल्या फेरीमधील गृहभेटीचे प्रमाण (10 गुण), प्रति हजार लोकसंख्येमध्ये कोविड-19 चाचणी (मोहीम कालावधीमध्ये) प्रमाण (30 गुण) CSR अंतर्गत किती मास्क व हात धुण्यासाठी किती साबण वाटप केले, प्रति हजार लोकसंख्या (20 गुण) किती SARI/ILI रुग्ण प्रती हजार लोकसंख्येत शोधून त्यांची चाचणी केली. (10 गुण) कोविड-19 मृत्यू प्रमाण (30 गुण) मिळालेल्या गुणांनुसार ग्रामपंचायत/वार्डातील हिरवे (75%+), पिवळे (41-74%), लाल पिवळे (41% पेक्षा कमी) कार्ड देण्यात येईल.

              हिरवे कार्ड दिलेल्या संस्थांसाठी बक्षिसांचे स्वरूप राज्यस्तर-  पहिले बक्षिस, रु.1 लाख, दुसरे-रु.50 हजार, तिसरे-रु.30 हजार.  जिल्हास्तर-  पहिले बक्षिस, रु.50 हजार, दुसरे-रु.30 हजार, तिसरे-रु.20 हजार.  महानगरपालिका स्तर- पहिले बक्षिस, रु.50 हजार, दुसरे-रु.30 हजार, तिसरे-रु.20 हजार, आमदार मतदारसंघ स्तर- पहिले बक्षिस, रु.10 हजार, दुसरे-रु.5 हजार, तिसरे-रु.3 हजार, असे राहणार आहे.

              "माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहीमेंतर्गत बक्षिस योजना राज्यात तसेच प्रत्येक जिल्हयात  राबविण्यात येणार आहे. ही बक्षिस योजना व्यक्ती व संस्थांसाठी असेल.

              या योजनेंतर्गत स्पर्धेचा कालावधी दि.16 ते 23 ऑक्टोबर 2020 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंतचा असेल. या कालावधीमध्ये प्राप्त साहित्याचाच स्पर्धेसाठी विचार करण्यात येईल. या मोहिमेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक