परिवहन विभागाचे कॉल सेंटर नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन


            अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)-  परिवहन कार्यालयामध्ये विविध कामांसाठी ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या लोकांना येणाऱ्या अडीअडचणींचे शंकानिरसन होण्यासाठी  परिवहन विभागाने 24 तास सेवा उपलब्ध असणारे कॉल सेंटर सुरु केले आहे. त्याचा दूरध्वनी क्र.022-62426666 असा आहे. या कॉल सेंटर वरुन अनुज्ञप्ती, नोंदणी, परवाना तसेच सर्व नमुन्यांची माहिती, शुल्क इत्यादी बाबतची सर्व माहिती  देण्यात येईल.  कॉल सेंटरवर नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे व एफएक्यू ची प्रत देण्यात आली आहे.  जास्तीत जास्त नागरिकांनी  कॉल सेंटरचा वापर करुन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी केले आहे.     

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज