निलक्रांतीसाठी मत्स्य संशोधन गरजेचे-ना.दीपक केसरकर



अलिबाग, जि. रायगड, दि.24(जिमाका)- महाराष्ट्रात मत्स्यशेती यशस्वी होऊन  निलक्रांती होण्याकरीता मत्स्य विकासात अद्यावत संशोधन होणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त,  नियोजन राज्यमंत्री ना.दीपक केसरकर यांनी  डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील मत्स्य व कृषि संशोधन प्रकल्पाची पाहणी नुकतीच (दि.21) करताना केले.
 यावेळी खार  जमीन संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.सुरेश दोडके, मत्स्यशास्त्रज्ञ डॉ.विवेक वर्तक, सहाय्यक कृषि  अभियंता डॉ.प्रविण इंगळे उपस्थित होते.
डॉ.दोडके यांनी खार जमीनीत केलेल्या संशोधनाबाबत तसेच डॉ.विवेक वर्तक यांनी मत्स्य संशोधन प्रकल्पाची माहिती देणारे सादरीकरण केले. केसरकर यांनी केंद्रावरील मत्स्यपिंजरे प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करुन त्याबाबतच्या तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे केंद्राच्या मत्स्यतलावातील नर तिलापीया, पंगॅशियस तसेच जिताडा माशांची प्रत्यक्ष पाहणी करुन त्यांच्या संवर्धनाविषयी व शेतकऱ्यांच्या उपयुक्तेविषयी माहिती घेतली. केंद्रातील उपक्रमाचे त्यांनी कौतुक करुन संशोधन कार्य वाढविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. केंद्रातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज