सन 2016-17 या वर्षाकरिता पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

दिनांक :- 31 ऑगस्ट  2016                                                वृत्त क्रमांक 566
सन 2016-17  या वर्षाकरिता पुरस्कारसाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अलिबाग दि.31 :- सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय कल्याण क्षेत्रात लक्षणीय व वैशिष्टयेपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना साहित्यरत्न लेाकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार  इत्यादी सन्माननीय व्यक्तींच्या नावाने पुरस्कार देण्यात येतात.  सन 2016-17  या वर्षाकरिता वरील पुरस्कारसाठी सामाजिक संस्था व समाज सेवक यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
            पुरस्कारांसाठी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात म्हणजेच मागासवर्गीय, पद्ददलित, दिव्यांग,वृध्द, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी क्षेत्रात वैशिट्येपूर्ण काम करणाऱ्या संस्थांकडून दरवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात.  प्राप्त प्रस्तांवाची राज्यस्तरीय समितीमार्फत छाननी करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
            पुरस्कारांसाठी अटी व शर्ती याबाबतच्या माहितीसाठी इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी  जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन, गोंधळपाडा अलिबाग येथे  संपर्क साधावा.  या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 10 सप्टेंबर 2016 ही असून इच्छुक उत्कृष्ट काम करत असलेले समाज सेवक व संस्था यांनी त्यांचे परिपूर्ण कागदपत्रांसह संबंधित कार्यालयाकडे विहित मुदतीत जमा करावेत असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत