जिल्हाधिकारी मॅडम शिक्षिकेच्या भूमिकेत धेंरड शाळेत घेतला विद्यार्थ्यांचा तास

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 19 ऑगस्ट 2016                                                   वृत्त क्र..536
जिल्हाधिकारी मॅडम शिक्षिकेच्या  भूमिकेत
धेंरड शाळेत  घेतला विद्यार्थ्यांचा तास

 अलिबाग दि.19 :-   माझ्या छोटया मुलाला घरी शिकवताना जो आनंद मिळतो, तोच आनंद मला धेंरड येथील दुसरी व तिसरीच्या वर्गावर इंग्रजीचा धडा शिकवताना मिळाला.  मुलांना इंग्रजी शब्दांचे स्पेलींग तसेच रंग ओळख, शब्द ओळख शिकवताना खूप आनंद वाटला अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी दिली.  कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या एक दिवस शाळेसाठी या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत त्यांनी आज अलिबाग तालुक्यातील धेंरड येथील शाळेत शिकवून शिक्षिकेची भूमिका निभावली.  जिल्हाधिकारी मॅडमनी यावेळी शाळेत माता व पालकांचे समवेत बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या.  शाळेसाठी कपाट, टेबल, मुलांसाठी काही खेळण्यांचे साहित्य अशा छोटया छोटया अपेक्षा पालकांनी बैठकीत व्यक्त केल्या असता  त्या तातडीने पुरविण्यासाठी एका कंपनीला सांगण्यात आले.  तसेच शाळेतील पाण्याच्या प्रश्नाबाबत ग्रामपंचायती मार्फत तो सोडविण्याचे संबधितास तातडीने सांगितले.  तर विद्यार्थ्यांना दुपारची खिचडी बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या गॅस बाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना   लक्ष देण्यास सूचना दिल्या. 
एकूणच  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी असते.  तथापि एक दिवस एखाद्या छोटयाशा शाळेसाठी देऊन तेथील अडीअडचणी प्रत्यक्ष अनुभवून त्या दूर करण्यासाठी एक चांगली संधी, एक दिवस शाळेसाठी या नाविन्यपूर्ण उपक्रमातून मिळाल्याने समाधान वाटले असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळेत धेंरडचे सरंपच सुनिल थळे, मंडळ अधिकारी शाम पाटील, तलाठी श्री.निकम पोलीस पाटील बाळकृष्ण म्हात्रे, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे पालक , ग्रामस्थ  उपस्थित होते.
0000
             



Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज